
माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त लिपिक सदाशिव किलजे यांचे निधन
रत्नागिरी दि. २५ : जिल्हा माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपीक सदाशिव लक्ष्मण किलजे यांचे आज पहाटे 03.00 वा. च्या सुमारास अल्पशा आजाराने चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 64 वर्षे होते. माहिती व जनसंपर्क विभागात सदाशिव किलजे यांनी 32 वर्षे वेगवेगळया पदावर काम होते. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी तसेच कोकण भवन येथे त्यांनी सेवा बजावली होती.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सुन, भाऊ, बहीण असा परिवार आहे. कै. किलजे यांच्या निधनाबद्दल उपसंचालक (माहिती), कोकण विभाग, डॉ. गणेश मुळये, जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी प्रशांत दैठणकर, कार्यालयातील कर्मचारी यांनी शोक व्यक्त केला.