चिपळूण येथील युनायटेड हायस्कूलसमोर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
चिपळूण : मुंबई-गोवा महामार्गावरील युनायटेड हायस्कूलच्या गेटसमोर भरधाव दुचाकीस्वाराने चारचाकी आय-20 ला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चारचाकी चालक जखमी झाला आहे. दुचाकीस्वार शैलेश वसंत चाळके (26, चिंचघरी, गणेशवाडी चिपळूण) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश शिर्के हे आपल्या ताब्यातील हुंडाई कंपनीची आय-20 चारचाकी घेऊन मुंबई- गोवा महामार्गावरून पाग ते वालोपे असे जात होते. याचवेळी बहादूरशेख नाका दिशेकडून भरधाव वेगाने येणारा दुचाकीस्वार शैलेश चाळके याने आय-20 ला ड्रायव्हरच्या बाजेने जोरदार धडक दिली. या अपघातात योगेश शिर्के यांना किरकोळ दुखापत झाली तर शैलेश याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद योगेश शिर्के यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार शैलेश याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.