गर्भलिंग निदान चाचण्याबाबत खबर देणाऱ्यास लाख रुपये बक्षीस देणार

रत्नागिरी दि. २५ : पीसीपीएनडीटी कायदयाचे उल्लंघन करणा-या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणा-या सोनोग्राफी केद, व्यक्ती किंवा डॉक्टर संस्था यांची माहिती देणाऱ्यास पीसीपीएनडीटी कायदयार्तगत शासनाची खबरी योजनेमधुन १ लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ.एस.एम.गावडे (फुले) यांनी दिली.

पीसीपीएनडीटी कायदयाचे उल्लंघन करणा-या तसेच बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणा-या
सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर ,संस्था यांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक (समुचित प्राधिकारी)

जिल्हा रुग्णालय व वैदयकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय यांना दयावी किंवा हेल्पलाईन क्रमांक १८००२३३४४७५ या क्रमांकावरही तक्रार नोंदविता येईल.

माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. सदर माहितीची खातरजमा करुन व त्याअनुशंगाने संबधीत सोनोग्राफी केंद्र, व्यक्ती किंवा डॉक्टर ,संस्था यांचेवर न्यायालयीन प्रकरण दाखल केल्यानंतर सबंधीत तक्रारदारास रु.१ लाख मात्र शासनामार्पत बक्षीस देण्यात येईल.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button