
माजी शिवसेना आमदार राजन साळवीं भाजपमध्ये प्रवेश करणार की नाही? प्रश्नावर भाजपा अध्यक्ष बावनकुळेनी काय उत्तर दिलं?
ठाकरे गटातील नेते राजन साळवी भाजपत कधी प्रवेश करणार? या प्रश्नावरही भाजपा अध्यक्ष बावनकुळे यांनी उत्तर दिलं. “माझी त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. एखाद्यावेळी साळवी यांचा विचार बदलू शकतो. उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर ते नाराज आहेत. मी त्यांच्याशी बोललेलो नाही. चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी विचारधारा कोणाला मान्य नाही” असं चंद्रशेखर बावनुकळे बोलले.