भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍड.दीपकजी पटवर्धन साहेब यांच्या नेतृत्वात आज रत्नागिरी MSEB कार्यालय नाचणे रोड येथे सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन धडकले
रत्नागिरी जिल्हा लोडशेडिंगच्या यादीत नाही असे शासना कडून निर्देश असताना पावस विभाग आणि जिल्ह्यातील अनेक विभागात वारंवार लोडशेडिंग केले जाते,रत्नागिरी शहरातही झाडगाव सबस्टेशन वरून जवळपास अर्धेअधिक शहर भागात गेली 2 ते 4 दिवस लोडशेडिंग करण्यात येत आहे. तसेच लाईट बिला सोबत जास्तीची वसुली करण्यासाठी ग्राहकांकडून डिपॉझिटची मागणी करण्यात आली आहे. सामान्य जनतेला अतिशय उन्हाळ्याच्या दिवसात नियम बाह्य लोडशेडिंगला सामोरे जात असताना डिपॉझिट स्वरूपात अधिकचा भुर्दंड का? भरावा, तसेच जिल्ह्यात होणारे लोडशेडिंग बंद करावे नाहीतर जनता कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही असे ठणकावून सांगण्यात आले. तसेच डिपॉझिट स्वरूपात आलेले अधिकचे बिल नागरिकांनी भरू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्हा यांच्याकडून करण्यात आले आहे.
या वेळी जबाबदार अधिकाऱ्यांन बरोबर संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत,तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे,शहराध्यक्ष साचिन करमरकर,अनिकेत पटवर्धन, विजय सालीम,राजू भाटलेकर,प्रमोद खेडेकर,राजू तोडणकर,मानसी करमरकर,प्रणाली रायकर,उमेश कुलकर्णी,राजन फाळके,नितीन जाधव,संदीप सुर्वे,विक्रम जैन, दादा ढेकणे,राजन पटवर्धन,प्रसाद दामले,मनोर दळी,पमु पाटील,गुरुप्रसाद फाटक,निशांत राजपाल,तुषार देसाई, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.