कुडाळ येथील जंगम दाम्पत्यावर काळाचा घाला; पती ठार, पत्नी गंभीर

राजापूर  : मालवाहू कंटेनर आणि अल्टो कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात अल्टो कार चालक दिलीप भिकलिंग जंगम (वय 65) राहणार- कुडाळ विठ्ठलवाडी हे जागीच ठार झाले आहेत. तर त्यांची पत्नी दीपाली दिलीप जंगम (वय 54) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना अधिक उपचाराठी रत्नागिरीत हलविण्यात आले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली वीज उपकेंद्राच्या समोर हा अपघात झाला.
शुक्रवारी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. अल्टो कार चालक दिलीप जंगम हे मुंबईकडून गोव्याच्या दिशेने जात असताना ते राजापूर कोदवली वीज उपकेंद्रानजीक आले असता महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करत ते निघाले असता समोरून गोव्याकडून मुंबईच्या दिशेने येणार्‍या कंटेनरवर ते आदळले. यात ते जागीच ठार झाले. तर पत्नी गंभीर जखमी झाली.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक शिल्पा वेंगुर्लेकर, पोलिस कर्मचारी संदीप गुरव, चालक विश्वास बाणे यांनी तत्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला. तर या ठिकाणी स्थानिक नागरिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button