
पादचार्याला दुचाकीने धडक दिल्याने पादचारी जखमी
रत्नागिरी ः रत्नागिरी-मजगांव रोडवरील स्वरूपानंद येथे राहणारे अशोक भाटकर हे कचरा टाकण्यासाठी रस्त्यावर चालत जात असता मोटरसायकलस्वार उमेश सरफरे याच्या दुचाकीची धडक त्यांना बसली. सदरचा दुचाकीस्वार रत्नागिरी ते विमानतळ असा जात होता. यामध्ये भाटकर हे जखमी झाले आहेत.
www.konkantoday.com