राजपत्रित अधिकारी महासंघाच्या, रत्नागिरी अध्यक्षपदी सुशांत खांडेकर
रत्नागिरी दि. 21 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृह, रत्नागिरी येथे राजपत्रित अधिकारी महासंघाच्या रत्नागिरी जिल्हा पुनर्घठना साठी बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष समीर भाटकर, सहचिटणीस सुदाम टाव्हरे, राज्य संघटक रमेश जंजाळ तसेच रत्नागिरी जिल्हयातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा समन्वय समिती व दुर्गा महिला मंच ची पुनर्गठन करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, रत्नागिरी शाखा पुनर्घठना
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, रत्नागिरी शाखा अध्यक्ष म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तर उपाध्यक्ष म्हणून एन.व्ही भादूले, सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, सागर ढोमकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, संतोष डाफळे, उपायुक्त जीएसटी यांची निवड करण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) जि.प. शेखर सावंत यांची कार्याध्यक्ष, उपविभागीय अधिकारी विकास सुर्यवंशी सरचिटणीस, जिल्हा प्रकल्प अधिकारी नंदिनी घाणेकर यांची महिला उपाध्यक्ष, कार्यकारी अभियंता, सा.बा. विभाग, रत्नागिरी वीना पुजारी यांची उपाध्यक्षा, खजिनदार म्हणून अपर जिल्हा कोषागार अधिकारी रत्नागिरी रविंद्र मोरे यांची निवड झाली. समितीचे सदस्य म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत चव्हाण, उपविभागीय अधिकारी, दापोली शरद पवार, उपविभागीय अधिकारी, चिपळूण प्रविण पवार, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र विद्या कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी श्रीकांत गायकवाड, जिल्हा सह आयुक्त, नगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालय तुषार बाबर यांची तर सदस्य सचिव म्हणून उपमुख्य कार्य अधिकारी (ग्रा.पं) राहुल देसाई यांची निवड करण्यात आली. तसेच समितीचे सल्लागार व मार्गदर्शक म्हणून संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी, रत्नागिरी व परिक्षित यादर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रत्नागिरी हे काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महिला दुर्गा मंच, रत्नागिरी शाखा पुनर्घठना
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महिला दुर्गा मंच, रत्नागिरी शाखा च्या अध्यक्षा म्हणून जिल्हा अधीक्षक भूमीलेख, रत्नागिरी एन.ए.पटेल यांची तर उपाध्यक्षा म्हणून जिल्हा अधीक्षक कृषिी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांची निवड करण्यात आली. महिला दुर्गा मंचाच्या सदस्या म्हणून उपविभागीय अधिकारी, खेड राजेश्री मोरे, उपविभागीय अधिकारी राजापूर वैशाली माने, उपजिल्हाधिकारी भूंसपादन (को.रे.प्र) ऐश्वर्या काळुशे, प्रकल्प उपसंचालक आत्मा, रत्नागिरी उर्मिला चिखले, नायब तहसीलदार माधवी कांबळे यांची सदस्या म्हणून तर सदस्य सचिव म्हणून तहसीलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय तेजस्विनी पाटील यांनी निवड झाली.
यावेळी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी विविध विषयांवर चर्चा व मागदर्शन केले. 2005 नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजन लागू करणे, राज्य प्रशासनातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने न भरता, नियमित वेतनश्रेण्यांवर भरणे, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटीसंदर्भातील खंड-२ अहवालीची विनाविलंब अंमलबजावणी करणे, विविध खात्यांमधील रखडलेल्या बढती प्रक्रिया विनाविलंब करणे, महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या ठिकाणी सुयोग्य सोयीसुविधा उपलब्ध होणे आदि विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.