
ऐन शिमगोत्सवात मेमू रेल्वे बंद, तरीही लोकप्रतिनिधी गप्प. शौकत मुकादम यांचा आरोप
ऐन शिमगोत्सवात कोकण रेल्वे प्रशासनाने रोहा-चिपळूण मेमू रद्द केल्याने कोकणात शिमगोत्सवासाठी येणार्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अनेक रेवेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तब्बल पाच ते सहा तास चाकरमान्यांना रेल्वेची वाट बघावी लागत आहे. मात्र कोकणातील एकही लोकप्रतिनिधी चाकरमान्यांच्या प्रश्नावर आवाज उठवताना दिसत नाही. लोकसभा निवडणुकीचा हंगाम सुू असताना चाकरमान्यांना होणारा त्रास हा इथ्या राजकीय पक्षाच्या अजेंड्याचा विषय नाही का, असा प्रश्न आता मतदार विचारत आहे. रेल्वे सुरू करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी म्हटले आहे. www.konkantoday.com