
बाळूमामांसोबत झळकणार रत्नागिरीची दीप्ती वहाळकर
रत्नागिरी शहरातील विद्यार्थीनी-अभिनेत्री दीप्ती वहाळकर हिची बाळूमामाच्या नावाने चांगभलं या मराठीवरील मालिकेसाठी निवड झाली आहे. या मालिकेसाठी निवडण्यात आलेली जिल्ह्यातील ती पहिली अभिनेत्री आहे. रमेश कीर कला अकादमीची ती विद्यार्थीनी. वेबमालिका तसेच एका व्यावसायिक नाटकात तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
दीप्तीची आता बाळूमामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेत यमुना या पात्रासाठी निवड झाली आहे. बाळूमामांच्या मुख्य भूमिकेसोबत असणारं यमुना हे पात्र मोठ्या कालावधीसाठी मालिकेत असणार आहे. सध्या गोरेगांव फिल्मसिटी मुंबई येथे या मालिकेचं शुटींग चालू आहे. www.konkantoday.com