
बारसू-सोलगाव येथे जागा संपादित करू नये म्हणून रिफायनरी विरोधकांचे एमआयडीसीला पत्र
रिफायनरी विरोधकांनी एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहित बारसू-सोलगाव या ठिकाणी जमीन संपादित करु नये, असं म्हटलं आहे.रिफायनरी किंवा रासायनिक प्रकल्पांसाठी लागणारी जमीन संपादित करु नये असा उल्लेख या पत्रात केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू-सोलगाव या ठिकाणी रिफायनरी उभारली जाईल अशी चर्चा होती. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रानंतर मात्र त्यांची खात्री झाली. पण, बारसू-सोलगाव या ठिकाणी एमआयडीसी उभारण्यास सरकार प्रयत्नशील होतं. त्याबाबतचं पहिलं नोटीफिकेशन देखील 2019 मध्ये निघालं. पण, अद्याप प्रशासकीय पातळीवर हालचाली मात्र काहीच नाहीत. असं असलं तरी या भागात रिफायनरी उभारण्याबाबत हालचाली सुरु असल्याने आता विरोधकांनी थेट एमआयडीसीला पत्र लिहित आपला विरोध दर्शवला आहे.
www.konkantoday.com