दापोली रत्नागिरी येथे ‘सुवर्णपालवी’ कृषी महोत्सव होणार साजरा
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली हे. महाराष्ट्रातीलच नव्हे ह तर भारतातील एक नामांकित कृषि विद्यापीठ असून कोकणातील शेतीचा मानबिंदू म्हणून सर्वत्र ओळख आहे. या विद्यापीठाची स्थापना कोकणचे सुपुत्र तत्कालीन कृषि मंत्री मा. ना. कै. डॉ. पी. के, तथा बाळासाहेब सावंत यांच्या प्रेरणेने १८ मे १९७२ रोजी झाली. सन २०२१-२२ हे वर्ष विद्यापीठाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून गेल्या ५० वर्षात विद्यापीठाने कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाच कार्य केले आहे. आतापर्यंत विद्यापीठाने विविध पिकांच्या जाती, कृषि औजारे आणि कृषि व तत्सम तंत्रज्ञानाच्या शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचिल्य साधून विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञनाचा प्रसार आणि प्रचार अधिक प्रभावीरित्या व्हावा, या उद्देशाने दि. १३ ते १७ मे, २०२२ या कालाधीत ‘सुवर्णपालवी’ या नावीन्यपूर्ण कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाबरोबरच इतर संस्थांनी केलेले कार्य, कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, यादृष्टीने महाराष्ट्रातील इतर तीन कृषि विद्यापीठे, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग व इतर विकास विभाग तसेच कृषि क्षेत्रात कार्यरत असलेल्या खाजगी कंपन्या, निमशासकीय संस्था, महामंडळे, बॅंका,बचतगट इत्यादी या कृषि महोत्सवात सहभागी होणार आहेत. या महोत्सवामध्ये विद्यापीठाने विकसित केलेल्या य ओळख होण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या विविध प्रक्षेत्रांवर प्रात्यक्षिकांचे आयोजनही करण्यात येणार आहेत. तसेच या महोत्सवाचे उदघाटन मा. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून त्याची सांगता मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांच्या कडून करण्यात येणार आहे
www.konkantoday.com