
माजी समाजकल्याण सभापती उबाठा गटाचे परशुराम कदम यांचा मंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश.
रत्नागिरी, रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदार संघात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी शेकडो कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.उबाठा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी निष्ठावन शिवसैनिकांना डावलुन आयरामांना संधी दिल्याने उबाठा गटातील पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. यामुळे परशुराम कदम यांच्यासह उबाठा गटातील शेकडो पदाधिकारी हे शिवसेनेत प्रवेश करत आहे. यावेळी परशुराम कदम म्हणाले की,’सध्या ज्या निष्ठावंतांना डावलणाऱ्या घडामोडी घडत आहेत, त्यावर नाराजी असून यापुढे मला सर्वसामान्य लोकांचे, प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी उदय सामंत यांची मदत होईल याच आशेने आज शिवसेनेत उदय सामंत यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश करत असल्याचं सांगितलं. यावेळी पत्रकार परिषद घेत मंत्री उदय सामंत म्हणाले की, परशुराम कदम यांसारख्या अनुभवी पदाधिकाऱ्याचा शिवसेनेत प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा फायदा ठरणार आहे. त्यांनी परशुराम कदम यांच्या राजकीय कारकिर्दीची प्रशंसा केली आणि सांगितले की, त्यांच्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यांना शिवसेनेत नेहमीच स्वागत आहे.परशुराम कदम यांच्या प्रवेशामुळे रत्नागिरीतील राजकारणात एक नवीन वळण लागले आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधासभा निवडणुकीत याचा फायदा होणार आहे. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.