राज्याच्या आरोग्यविभागा कडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना
संभाव्य चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाकडून सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकार्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आहेत.या नुसार जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाला ‘अॅलर्ट’ राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यास तपासण्यांचे प्रमाणही वाढवा अशाही सूचना आरोग्य विभागाकडून आल्याने खबरदारी घेतली जाणार आहे. रत्नागिरीत अद्यापही तशी परिस्थिती नाही. मात्र, खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली
www.konkantoday.com