पोचरी गावातील नळपाणी योजनेसाठी नामदार उदय सामंत यांनी दिला आमदार निधी
पोचरी गावातील येदरे -सोलकर आणि बारगुडे यांच्या नळपाणी योजनेला पोचरी गावातील श्री केदार चंद्रकांत पटवर्धन यांनी 1 गुंठा जमीन विनामोबदला बक्षीसपत्राने दिली होती. सदर योजना राबविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ग्रामस्थांच्या मागणीवरून आमदार निधीतून सदर योजनेसाठी 7 लाख रु निधी वितरित केला होता. सदर योजना पूर्ण होण्यासाठी अधिकचा निधी आवश्यक असल्याने ग्रामस्थानी नामदार उदय सामंत यांना भेटून अधिकचा निधी मिळावा म्हणून मागणी केली.
यावेळी पोचरी गावातील चेतन येदरे, संभा येदरे, चंद्रकांत येदरे, विश्वास सोलकर, प्रकाश सोलकर तसेच केदार पटवर्धन उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळे ना उदय सामंत यांनी देखील तातडीने दखल घेऊन निधी लगेच मंजूर केला.गावकऱ्यांनी नामदार उदय सामंत यांचा फणस देऊन सत्कार केला
मंत्री सामंत यांनी निधी देण्याच्या निर्णयाचे पोचरी गावकऱ्याकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
www.konkantoday.com