फिनोलेक्स अॅकॅडमीत आंतरराष्ट्रीय परिषद
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, रत्नागिरी या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कम्युनिकेशन अँड कॉम्प्युटिंग 2022 ही आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. ज्यामध्ये शैक्षणिक, संशोधक आणि उद्योग जगतातील तज्ज्ञांचा सहभाग होता. आय. सी. सी. सी. 2022 या आंतरराष्ट्रीय परिषदेची मुख्य उद्दिष्टे कम्युनिकेशन, कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग या क्षेत्रात दर्जेदार संशोधन निर्माण करणे, संशोधक व तरूण अभियंत्यांना अनुभव आणि ज्ञान मिळवण्याची संधी प्रदान करणे तसेच त्याचे आदान-प्रदान करणे, यासाठी एक मंच प्रदान करणे, विद्यार्थी आणि संशोधकांमध्ये सर्जनशील संवादाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्र आणि संशोधन पद्धतींबद्दल अधिक ज्ञान देणे ही होती. जगभरातील संशोधकांना त्यांचे संशोधन कार्य आणि संशोधन लेख सादरीकरण करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. पहिल्या दिवशी डॉ. शारदा चौगुले (तांत्रिक कार्यक्रम अध्यक्षा) यांनी परिषदेबद्दल माहिती दिली तसेच डॉ. विनायक भराडी (प्रकाशन अध्यक्ष ) यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. प्रा. वृषाली निंबाळकर यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात अॅप्लिकेशन्सचा दैनंदिन जीवनातील वापर या विषयावर प्रकाश टाकला.