
रत्नागिरीतील परकार मेडिकल स्कूलचे पथनाट्य देशात द्वितीय
देशपातळीवरील पथनाट्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार्या परकार मेडिकल स्कूल ऑफ नर्सिंगच्या (रत्नागिरी) विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक मिळवला. द्वितीय वर्षाला असणार्या जीएनएम विद्यार्थ्यांचे याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त या रोगाचे समूळ उच्चाटन व्हावे, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अनेक जनजागृतीचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक क्षयरोग दिन म्हणून 24 मार्च हा दिवस ओळखला जातो. या दिनानिमित्त एल. टी. एस.जी स्कूल ऑफ नर्सिंग आणि सायन हॉस्पिटल मुंबई यांच्याद्वारे ही स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचा निकाल 13 एप्रिलला जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक कुपर हॉस्पीटल व स्कुल ऑफ नर्सिंग मुंबईने पटकावला. याबद्दल व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. मतिन परकार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन केले.
