
मुझम्मील काझी राज्यस्तरीय रत्नसिंधु आदर्श पत्रकार पुरस्कार २०२२ ने सन्मानित
रत्नागिरी:- ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडियाचे संपादक तथा युवा पत्रकार मुझम्मील काझी यांना नुकतेच राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुझम्मील काझी यांचा डिजिटल मिडीया हा आवडता विषय असुन त्यात ही सामाजिक पत्रकारितेवर त्यांनी काम केले आहे . विविध वेब पोर्टल , न्यूज युट्युब चॅनल, प्रिंट मिडीया अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानंतर त्यांनी स्वतः ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडीयाची स्थापना केली.अल्पावधीतच ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडीयाने उंच भरारी घेतली.
पत्रकारिता करत असताना त्यांना ज्येष्ठ पत्रकार,मार्गदर्शक सुहास खंडागळे व तसेच इतर पत्रकारांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.
आताचे युग हे डिजिटल युग आहे.नेहमी बदलणारे युग आहे.सातत्याने बदल होणाऱ्या युगात डिजिटल मिडीयामध्ये सुद्धा वेळोवेळी बदल होत आहेत. बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या योग्य वापर करुन उत्तमरित्या पत्रकारिता मुझम्मील काझी करत आहेत.
ग्रामीण वार्ता या डिजिटल मिडीयात विविध सोशल माध्यमांचा पुरेपुर वापर करुन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत ग्रामीण वार्ता हे माध्यम पोहचले आहे.
पत्रकारितेसोबतच समाज कार्यात ही मुझम्मील काझी यांनी भरीव कामगिरी केली आहे. कोकणातील नावाजलेली तरुणांची संघटना गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा या संघटनेच्या रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत.त्यांच्या याच कार्याची दखल घेत रत्नसिंधु कोकण विभाग कलामंच,महाराष्ट्र या संस्थेमार्फत राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार २०२२ ने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यीक विचारवंत प्रा.एम.के.कांबळे यांच्या शुभहस्ते सन्मानित केले गेले.
मुझम्मील काझी यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांच्या सहकारी,उद्योजक आसिफ खल्पे व तसेच गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे,अध्यक्ष उदय गोताड,उपाध्यक्ष राहुल यादव व तसेच सर्व पदाधिकारी,नातेवाईक,मित्र परिवाराने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला रत्नसिंधु कलामंच,रत्नागिरीचे संस्थापक अध्यक्ष सुनिल जाधव,महासचिव मिलन जाधव व तसेच
काव्य व गझलकार प्रा.बाळासाहेब लबडे,प्रसिद्ध साहित्यिका किर्ती काळमेघ-वनकर,जनार्दन मोहिते,डॉ.जितेंद्र मोहिते,अनंत जाधव,संतोष पवार,मुग्धा कुळ्ये,आनंद तापेकर,उक्षी गावच्या सरपंच सौ.किरण जाधव,उज्मा मापारी,रविंद्र जाधव,पुनम गमरे,शुभांगी तापेकर व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.