कुवारबाव येथील एटीएम फोडणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
रत्नागिरी : कुवारबाव येथील ऍक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला शहर पोलिसांनी रेल्वेस्टेशनवर बेड्या ठोकल्या. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आसिफ उस्मान डांगे (वय 19, राहणार बत्तीस शिराळा, सांगली ) याला अटक केली. ही एटीएम फोडण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.
एटीएम कॅश बॉक्सचा पुढील लोखंडी दरवाजा अर्धवट उघडून चोरी करण्याचा प्रयत्न चोरट्याने केला होता.
मंगेश मोहन चाळके (वय 37, रा. खेडशी, रत्नागिरी ) यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.