
प्रत्येक महाविद्यालयाने आयडॉलचे केंद्र सुरू करावे : डॉ. प्रकाश महानवर
रत्नागिरी : प्रत्येक महाविद्यालयाने आयडॉलचे केंद्र सुरू करावे. त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मुंबई विद्यापीठाच्यामार्फत केली जाईल, असे मत आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले. रत्नागिरी येथे 25 महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीत सिनेट सदस्य धनेश सावंत हे देखील उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराला या दोघांनीही भेट दिली आणि समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर, आयडॉल कर्मचारी प्रसाद कशेळकर, प्रसाद फडके, सागर साळुंके आणि अंकेश रांबाडे उपस्थित होते. महाविद्यालयांनी नवीन कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करून त्याचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडे सादर करावा, असे आवाहन सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी यावेळी केले.