
धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशाविरोधात साखळी उपोषण.
राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा शासनाच्या आदेशाला न जुमानता सुरूच असल्याने व प्रशासन या मदरशाबाबत कठोर कारवाई न करता, स्थानिक ग्रामस्थांचे मत ऐकून न घेता एकतर्फी निर्णय देत असल्याचे पन्हळे तर्फ राजापूरच्या ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून अनधिकृत मदरसा बंद होईपर्यंत साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.
या उपोषणाला राजापूर प्रांताधिकारी डॉ. जास्मिन यांनी भेट दिली. आठ दिवसात यावर निर्णय घेतला जाईल तुर्तास उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. परंतु वर्षभर प्रशासन आम्हाला झुलवत आहे. त्यामुळे आम्ही कारवाई करा मगच आम्ही उपोषण स्थगित करतो, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली.www.konkantoday.com