खेड भरणे नाका परिसरात खासगी आराम बस पलटी ३० प्रवाशी जखमी, दहा गंभीर तर दुसऱ्या अपघातात सात जण जखमी

  मुंबई गोवा महामार्गावरील भरणे नाका  परिसरातील  रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात खासगी आराम पलटी होऊन झालेल्या अपघातात तीसहून अधिक प्रवाशी जखमी झाले. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास  हा अपघात घडला. मुंबई परेल येथून केळणे गोमळेवाडी येथे लग्नकार्यासाठी प्रवासी घेऊन जाणारी खासगी आराम बस महामार्गावरील भरणे नाका येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि  बस रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात बसमधून प्रवास करण्याऱ्या प्रवाशांपैकी तीसहून अधिकजण जखमी असून दहाजण गंभीर जखमी आहेत . दुसरा अपघात कळंबणी वाळंजवाडी येथे घडला या अपघातात तवेरा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पलटी होऊन सातजण जखमी झाले आहेत. तवेरा ही मुंबईहून जयगडकडे जायला निघाली होती. जखमींना तात्काळ कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची खबर मिळताच  मदत ग्रुपचे प्रसाद गांधी आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरु केले.
घटना स्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार खेड तालुक्यातील केळणे गोमळेवाडी येथे असलेल्या लग्नकार्यासाठी मुंबईतील परेल येथून नातेवाईक निघाले होते. मध्यरात्री परेल येथून निघालेली खासगी आराम बस महामार्गावरील भरणे नाका परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक पोहचली असता चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि टी बस  रस्त्याच्या डाव्या बाजूला खड्ड्यात पलटी झाली.
भरधाव वेगातील बसला अपघात होताच बसमधील प्रवाशांनी जोरात आरडाओरडा करायला सुरवात केली. अपघातादरम्यांनझालेला जोरदार आवाज आणि प्रवाश्यांचा आरओरडा ऐकून ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम ग्रामस्थांनी सुरु केले. दरम्यान खेड येथील मदत ग्रुपचे अध्यक्ष प्रसाद गांधी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशाना मदत ग्रुपच्या रुग्णवाहिकेची तात्काळ कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी जणांची प्रकुर्ती गंभीर असल्याचे रुग्णालय सूत्रांकडून सांगण्यात आले. या अपघाताची खबर लग्नकार्य असलेल्या केळणे गावात कळताच ग्रामस्थांनी रुग्णालयात धाव घेतली.
दुसऱ्या  अपघात महामार्गावरील कळंबणी वाळंजवाडी येथे झाला. मुंबईहून जयगड येथे जायला निघालेली तवेरा कार महामार्गावरील कळंबणी वाळंजवाडी येथे आली असता  चालकाचा ताबा सूटला आणि भरधाव वेगातील तवेरा कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली या अपघातातही सातजण जखमी झाले असून त्यांना ही  कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात देखील सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे प्रत्यक्षदर्शीनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  
दोन्ही अपघातातील जखमी सध्या कळम्बनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून खेड पोलीस घटनास्थळी पंचनाम्याची रवाना झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button