आडिवरे येथील उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना ‘रिगल कोकणरत्न’ पुरस्कार
रीड ऑर्गन या वाद्यावर संशोधन करून त्या वाद्याला नवसंजीवनी देणाऱ्या तालुक्यातील आडिवरे येथील उमाशंकर उर्फ बाळ दाते यांना रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण चा ‘रिगल कोकणरत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे.विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांना रिगल कोकणरत्न ‘ हा सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे. रिगल एज्युकेशन सोसायटी, चिपळूण यांच्या वतीने यावर्षी प्रथमच रविवार दि. १७ एप्रिल २०२२ रोजी ‘रिगल कोकणरत्न’ हा भव्य सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. यावेळी बाळ दाते यांना हा पुरस्कार देवून सन्मानित केले जाणार आहे.
www.konkantoday.com