रत्नागिरीतील आरेवारे आणि भाटय़ेचा समुद्र किनाऱ्यावर तेलाचा तवंग
पर्यटकांची मोठी गर्दी असलेल्या रत्नागिरीतील आरेवारे आणि भाटय़ेचा समुद्र किनाऱ्यावर तेलाचा तवंग येण्याचा प्रकार घडला आहे
या तवंगामुळे हे किनारे विद्रूप झाले असून पर्यावरणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहेआरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर एक ते दीड किलोमीटर परिसरात तेलकट काळे गोळे साचलेले आहेत. असा पहिलाच प्रकार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. भाटय़े किनारी काही भागांत तेलमिश्रित गोळे आहेत.जहाजामधून गळती झालेले तेल वाहत किनाऱ्यावर आले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक वेळा मालवाहू जहाजाच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना खराब झालेले तेल समुद्रात टाकले जाते. ते तवंग गोळय़ाच्या रूपाने किनाऱ्यावर येण्याची शक्यता असते. यामुळे सागरी प्रदूषणाला सामोरे जावे लागणार असून प्रशासनाकडून वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com