कोंडगावमध्ये ११ गावे मिळून साजरी करतात बाबासाहेबांची जयंती
संगमेश्वर : तालुक्यातील कोंडगावमध्ये सुमारे ४२ वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात येत आहे. परिसरातील ११ गावे मिळून ही जयंती साजरी करण्यात येत आहे. गुरुवारी हा जयंतीचा उत्सव उत्साहात पार पडला. धम्म रॅलीमध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेला व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे महाराज नगरचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत पाटेकर व नगरमधील सर्व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.