विद्यापीठाचे आयडॉल रत्नागिरी केंद्र अधिक सक्षम करण्याचे नियोजन- संचालक डॉ प्रकाश महानवर
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन अर्थात आयडॉलचे संचालक डॉ प्रकाश महानवर आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराला भेट दिली आणि आयडॉल अर्थात दूर व मुक्त अध्ययन केंद्राच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व जाणून घेतल्या व त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही डॉ. प्रकाश महानवर यांनी दिली तसेच दूर व मुक्त अध्ययन केंद्राच्या वतीने विद्यार्थ्यांना पुस्तकं तातडीने उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती देखील डॉ प्रकाश महानवर यांनी दिली. डॉ प्रकाश महानवर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि उपपरिसराचे प्रमुख किशोर सुखटणकर यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील महाविद्यालयातील प्राचार्यांशी एका बैठकीचं देखील आयोजन कऱण्यात आलं होतं. या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्यातील २५ महाविद्यालयातील प्राचार्य उपस्थित होते. बैठकीत आयडॉलची पुढची दिशा आणि वेगवेगळे सुरू होणारे अभ्यासक्रम यांची माहिती डॉ प्रकाश महानवर यांनी दिली व प्रत्येक महाविद्यालाने देखील आयडॉलचं केंद्र सुरू करावं त्यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत मुंबई विद्यापीठाच्या मार्फत केली जाईल असं डॉ प्रकाश महानवर यांनी सांगितलं.
तसेच कोणत्याही कोकणातील महाविद्यालयाने नवीन कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करून त्याचा प्रस्ताव मुंबई विद्यापीठाकडे सादर केला तर तो दूर व मुक्त अध्ययन केंद्राच्या मार्फत सुरू केला जाऊ शकतो त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा असं सिनेट सदस्य प्रदीप सावंत म्हणाले.. यावेळी रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर यांनी उपपरिसराची माहिती दिली आयडॉल कर्मचारी प्रसाद कशेळकर, प्रसाद फडके, सागर साळुंके आणि अंकेश रांबाडे यावेळी उपस्थित होते.