
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल
राज्याचे परिवहन मंत्री आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना ताप आल्यामुळे ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळपासून त्यांच्यावर उपचार सुरू असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
प्रताप सरनाईक हे मागील काही दिवसांपासून परिवहन खात्याच्या कामात व्यस्त होते. त्यांच्या जवळ धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी तसेच शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्कमंत्री म्हणूनही कामकाज सुरू होते. दोन-तीन दिवसांपासून अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी बुधवारी सायंकाळी स्वतःहून ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची विविध चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ताप असल्याचे निदान झाले. त्यानंतर कोरोना, डेंग्यू आणि टायफॉइड यांसारख्या आजारांची चाचणी करण्यात आली. सुदैवाने या सर्व चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तापामुळे त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे.