जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीच्या नामफलकाचे उदघाटन.

दिनांक १२/०४/२०२२ रोजी जयगड येथे ग्रामस्थांनी विविध विषय घेऊन जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीची स्थापन करण्यात आली आहे. या कृती समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त, कामगार, शेतकरी, बागायतदार, मच्छिमार,यांचे असंख्य समस्या आहेत.
जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीच्या नामफलकाचे उदघाटन जयगड ग्रामपंचायत सरपंच फरजाना डांगे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच त्यांनी कृती समितीला शुभेच्छा दिल्या त्याच बरोबर कार्यक्रमाची सुरवात सागार खाडे, श्रीकृष्ण बिवलकर यांनी श्रीफळ वाढवून केली.
कार्यक्रमात विचार मांडताना कृती समितीचे सचिव आदेश खाडे. यांनी मार्गदर्शन केलं. त्यात ते म्हणाले जयगड मध्ये प्रकल्पग्रस्त कामगार, शेतकरी, बागायतदार, मच्छिमार, यांचे खूप प्रश्न आहेत. त्यांना जयगड पंचक्रोशी बचाव कृती समितीच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. कोणताही प्रकल्प येण्या आधी किव्हा प्रकल्प आल्या नंतर संघर्ष अटळ असतो. प्रदूषणाचा विषय असो. किव्हा रोजगाराचा विषय असो स्थानिकांचे प्रश्न वाढत जातात सुटत नाही. असे प्रश्न सोडवण्यासाठी किव्हा प्रत्येक ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी अश्या कृती समिती स्थापन कराव्या लागतात. हेच आपलं दुदैव आहे. प्रकल्प येण्या आधी प्रकल्पाचे हितचिंतक खूप मोठे मोठे अमिश दाखवतात तुमच्या मुलांना तसेच हजारो बेरोजगारांना कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील तुम्हाला रोजगार मिळेल. शाळा,कॉलेज, अत्याधुनिक दवाखाने. बांधून मिळतील. तुमच्या गावाचा विकास होईल. त्यामुळे तुमच्या जमिनी प्रकल्पाला द्या. अश्या भूल थापा मारून प्रकल्पाचे हीत चितक जातात.आणि जे.एस.डब्ल्यू. सारखा प्रदूषित प्रकल्प येतो. पर्यावरणाची वाट लावून टाकतो. बेरोजगारी वाढते जर आपण सर्व ग्रामस्थ एकत्र आलो की पर्यावरण, कामगार,प्रकल्पग्रस्त मच्छिमार, ग्रामस्थांनचे विषय योग्य प्रकारे हाताळू शकतो. त्यांना योग्यतो न्याय मिळवून देऊ शकतो. सर्वांनी एकत्र यावे अशी विनंती करण्यात आली आहे.
त्याच बरोबर या कार्यक्रमात जयगड ग्रामपंचायत सदस्या सौ.देवयानी खाडे, अरुणा शिरधनकर, अदिती खाडे, विराज महाकाळ, सौरभ माने, सागर खाडे, श्रीकृष्ण बिवलकर, नितीन पोवार, देविदास खाडे, अमोल झगडे,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button