खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेला १८लाख २९ हजाराचा निव्वळ नफा: संतोष पावरी


——————————————–
रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने ३१ मार्च २०२२ अखेर केवळ ४० महिन्याच्या कार्यकाळात १८लाख २९ हजाराचा नफा प्राप्त करत ‘अ’ वर्ग प्राप्त करून जनमानसात एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.त्यामुळे खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेची ही वाटचाल खऱ्या अर्थाने विश्वासहार्य होताना दिसत आहे.
गत ४० महिन्याच्या कालावधी मध्ये जवळ-जवळ २०महिन्याचा कालावधी कोव्हीड-१९या महामारीने ने ग्रासलेला होता. दिर्घकालीन लॉकडाऊनमुळे क्षतीग्रस्त व्यवसाय जगत, ठप्प झालेले जनजीवन या सर्वांमध्येही ग्राहकांना नियोजनबद्ध ,नम्र व जलद सेवा देत शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणांचा त्यांचे अंमलबजावणीसाठी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यामुळे सर्वच आदर्श प्रमाणांच्या बाबतीत संस्थेने यशस्वीपणे काम केलेले आहे.अल्पावधीतच संस्थेचा आर्थिक सक्षमतेचा पाया भक्कम झालेला आहे. संस्था आपल्या आर्थिक सक्षमते बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत तसेच सभासदांच्या हिताला प्राधान्य देत असतानाच ठेवीदारांनाही त्यांच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न करत आहे. आर्थिक स्पर्धेच्या या युगात अर्थकारणाची गती राखण्याचं आव्हान आमच्या खारवी सामाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने पेलले. आर्थिक शिस्त,विश्वासार्हता, ग्राहक सेवा या गोष्टी जपत “खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने” आपला आर्थिक व्यवहार वर्धिष्णू केला आहे.
संस्थेची मार्च २०२२ अखेर ३९४७ सभासद संख्या , ०५ कोटी ६२ लाखाच्या ठेवी, ०४ कोटी ४० लाखांची कर्जे, ०२कोटी ४६ लाखाची गुंतवणूक, ७ कोटी १६ लाखांचे खेळते भांडवल, ,१ कोटी १२ लाख स्वनिधी, ६१.१४% सी. डी.रेशो,९५.०६% वसुली.१००% सोनेतारण कर्ज वसुली. या आर्थिक वर्धिष्णू वाटचाळीमुळे राज्यातील काही निवडक संस्थामध्ये खारवी समाज पतसंस्थेच्या समावेश होत आहे.
जिल्हा स्थरावरचे कार्यक्षेत्र असतानाही १ शाखा व १ सेवाकेंद्राच्या आधारावर सलग ४ वर्षे ‘अ’वर्ग प्राप्त ,आदर्श प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात नफा असणारी संस्था,पहिल्या वर्षापासूनच सभासदांना शेअर्स च्या रकमेवर लाभांश देणारी पतसंस्था,४० महिन्यात सोने तारण कर्ज मुदतीत कर्ज खाते बंद करून एकही कर्ज खात्याचा लिलाव न करण्यास पात्र ठरलेली पतसंस्था,संस्थेचा संपूर्ण व्यवहार संगणिकृत असणारी पतसंस्था, सभासदांचे मनोबल उंचावून सभासदांमध्ये खऱ्या अर्थाने सहकार रुजवणारी आपली पतसंस्था.अल्पावधीतच शाखाविस्तारांचा प्रस्ताव सादर करणारी पतसंस्था.
संस्थेच्या अर्थचक्राला उत्तम सेवा देऊन गतिमान करणारे १३ जणांचे सन्मा.संचालक मंडळ ५ जणांचा कर्मचारी वर्ग,१३ जणांचे जिल्हा समनव्य समिती मंडळ व नवनियुक्त १ तज्ञ संचालक आहेत संस्थेचे गतिमान झालेले मार्गक्रमण संपूर्ण जिल्ह्याला गवसणी घालते झाले.अत्यल्प थकबाकी, विक्रमी वसुली ही परंपरा कायम ठेवण्यात संस्था याही वर्षी यशस्वी झाली आहे.आपल्या अर्थकारणात व्यावसायिकता आणि सहकारतत्त्व यांची सांगड घालून विस्तारत आहे.सहकारातील सामुहिक ताकद निर्माण करताना नवतंत्रज्ञान, व्यवसाय संधी याचा कायद्याच्या परिघात राहत अचूक लाभ उठवत ग्राहकांनाही या लाभात सहभागी करून घेणारी *खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था संस्थेचा हा प्रवास समृद्धतेचा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button