पावसाळ्यापूर्वी रस्त्यांचे काम पूर्ण व्हावे : भाजप शहर चिटणीस निलेश आखाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी.
रत्नागिरी : शहरातील अनेक भागात रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली काही ठिकाणी मुख्य रस्ते करण्यात आले मात्र अनेक ठिकाणी अंतर्गत असणारे रस्ते यांच्या कामाला गती मिळालेली दिसून येत नाही नळपाणी योजनेचे काम पूर्ण होऊनही शहरातील अनेक भागात रस्त्यांचे काम रखडलेली दिसून येत आहे. प्रभाग क्र. ६ विश्वनगर, आंबेशेत, नुतननगर, आनंद नगर, राजेंद्र नगर, चैत्रबन, कर्लेकर वाडी आदी परिसरात रस्त्यांचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे परिसरात वाहन चालकांना व धुळीमुळे पादचाऱ्यांना देखील नाहक त्रास सहन करावा लागत आहे नळ पाणी योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत रस्ते होणार नाही असे कारण सांगितले जात होते. मात्र अद्यापही रस्त्यांचे काम होताना दिसून येत नाही. रस्त्यांचे काम पावसापूर्वी पूर्ण झाले नाही तर रत्नागिरी शहरवासीयांना याचा प्रचंड त्रास होणार आहे. तरी प्रशासनाने याबाबत भूमिका घेऊन शहरातील सर्व अंतर्गत रस्ते पावसाळ्यापूर्वी जलद पूर्ण करावेत. साधारणपणे 15 मे पासून पावसास सुरवात होते व रस्त्यांची कामे करण्यास अडथळा येतो व पावसाचे कारण पुढे करत रस्त्यांची कामे थांबवली जातात, त्यामुळे पावसा पूर्वी शहरातील रस्ते सिलकोट सहित चांगल्या दर्जाचे व्हावेत ही अपेक्षा सर्वसामान्य रत्नागिरीकर व्यक्त करीत आहे.जिल्हाधिकारी महोदयांनी यावर लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात ही विनंती. निलेश आखाडे. भाजपा भटके विमुक्त जिल्हाध्यक्ष / रत्नागिरी शहर चिटणीस याांनी ई-मेल द्वारे निवेदन सादर करून जिल्हाधिकारी यांना केली.