ना. उदयजी सामंत यांनी नाणीजक्षेत्री भेट देऊन श्रीराम जन्मोत्सव वारी उत्सवात सहभाग घेतला
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मा. ना. उदयजी सामंत यांनी काल नाणीजक्षेत्री भेट देऊन श्रीराम जन्मोत्सव वारी उत्सवात सहभाग घेत जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज यांचे दर्शन घेतले. त्यावेळी पिठाचे उत्तराधिकारी प. पू. कानिफनाथ महाराज यांनी ना. उदय सामंत ह्यांचा सत्कार केला. याप्रसंगी संस्थानचे पदाधिकारी विनोद भागवत, राजन बोडेकर, विभागप्रमुख तात्या सावंत, परेश सावंत आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com