
कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण 28 एप्रिलपासून सुरू
कोकणात गणपती उत्सवाला जाण्यासाठी चाकरमानी वर्षभरापासून तयारी करीत असतात. कोरोनाची पेशंटची संख्या अत्यंत कमी होत असल्याने यंदाचा गणपती उत्सव नेहमीच्या पारंपारिक पद्धतीने मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे.यावर्षी दहा दिवस आधीच गणरायाचे आगमन होत आहे. यंदा गणपती बाप्पाचे आगमन 31 ऑगस्ट रोजी आहे. त्यामुळे रेल्वे तिकीटांचे 120 दिवस आधी पासून सुरू होणारे रेल्वेच्या तिकीटांचे आरक्षण एप्रिलअखेर सुरू होत आहे.
कोकणात होळी आणि गणपती उत्सव मोठ्या पारंपारिक पद्धतीने आजही साजरा केला जातो. त्यामुळे चाकरमान्यांना आतापासूनच गणपती सणाच्या वेध लागले आहेत. कोरोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे गणपती सणाच्या आनंदाला कोरोना नियमांचा अडसर आला होता. यंदा गणपतीचा सण मोठ्या उत्साहात होणार असून कोकण रेल्वेच्या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण 28 एप्रिलपासून सुरू होत आहे.
www.konkantoday.com