
राजापूरमध्ये महिलांना शिलाई मशीनचे वाटप
राजापूर : ‘बर्न्स अँड मॅकडोनेल’ कंपनीच्या सीएसआर फंडामधून तसेच ‘ओम चैतन्य ट्रस्ट’ यांच्या सहकार्याने दहा महिला बचत गटांना ऑटोमॅटिक शिलाई मशीनचे वाटप नुकतेच करण्यात आले. राजापूर नगर वाचनालय सभागृहात कंपनीचे प्रतिनिधी आशिष कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर महेश शिवलकर, धोपेश्वर सरपंच स्नेहा उगले, पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र मोहिते, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, धोपेश्वर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम खांबल, सामाजिक कार्यकर्ते रमेश मांजरेकर, त्रिवेणी संगम बचत गटाचे राजन लाड आदी उपस्थित
होते. यावेळी धोपेश्वर, अणसुरे, तुळसुंदे, कुवेशी, जैतापूर, मोगरे, भालावली, धाऊलवल्ली आदी गावातील स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य तसेच गाव समिती व संघ पदाधिकारी महिला उपस्थित होत्या.