
विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रीक्वेंसी ओम्नी डायरेक्शन रेडिओ रेंजखातेदारांना पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते भूसंपादन मोबदला धनादेश
रत्नागिरी, दि. 1 ) : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा अंतर्गत शासन आपल्या दारी उपक्रमामधून भारतीय तटरक्षक अवस्थान यासाठी विमानतळ येथे डॉप्लर व्हेरी फ्रीक्वेंसी ओम्नी डायरेक्शन रेडिओ रेंज (डीव्हीओआर) करिता भूसंपादन करण्यात आले. खातेदार चेतन जगदीश चौहान, राजकुमार चौहान, माया चौहान यांना 1 कोटी 77 लाख 4 हजार 795 रुपयांचा मोबदल्याचा धनादेश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज देण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी प्रातांधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते.
000




