
कोकण रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला
आता कोकण रेल्वेने उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिविमदरम्यान 14 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 7 एप्रिलपासून ते 20 एप्रिलदरम्यान धावणार आहेत. या गाड्यांची बुकिंग संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाईटवर सुरू झाली आहेया गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा येथे थांबणार आहेत. तसेच आरवली रोड, संगमेश्वर रोड, अडवळ, विलवडे. राजापूर रोड. वाभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकांवर देखील या गाड्या थांबणार आहेत. या गाड्यामध्ये 22 कोच फर्स्ट एसी तसेच – 01 कोच, 2 टियर एसी – 03 कोच अशी सुविधा असणार आहे.
तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्याने मध्य रेल्वेने मुंबई-कोकण (konkan) आणि मुंबई-नागपूर मार्गावर विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीदरम्यान 14 फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर-मालदादरम्यान 36 फेऱ्या धावणार आहेत.
www.konkantoday.com