कोकणात मनसेला फटका खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर सहा वर्षांसाठी अपात्र, नगर परिषद कारभारात गैरवर्तन केल्याचा ठपका

खेड : कोकणात मनसेला फटका बसला आहे. नगर परिषदेत सत्ता असणाऱ्या मनसेच्या तत्कालीन नगराध्यक्षांवर नगर परिषद कारभारात गैरवर्तन केल्याप्रकरणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मनसेचे प्रदेश सरचिटणीस तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना सहा वर्षे अपात्र करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या निर्णयावर प्रतिक्रिया देताना खेडेकर म्हणाले, या निर्णयाविरोधात मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करावा म्हणून अनेक डाव खेळण्यात आले. त्यापैकीच हा एक डाव होता. मी शिवसेनेत येत नाही म्हटल्यावर हा निर्णय अपेक्षित होता. माझा नगराध्यक्ष पदाचा कालावधी मी पूर्ण केला आहे.

गुरुवारी दि. ७ रोजी हे आदेश दिल्यानंतर खेडमध्ये शिवसैनिकांनी जल्लोष केला आहे. याबाबत नगर परिषदेचे तत्कालीन गटनेते प्रज्योत तोडकरी व अन्य आठ नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची सुनावणी ऑक्टोबर महिन्यात ना. शिंदे यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली होती. नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या आदेशानुसार वैभव खेडेकर यांना महाराष्ट्र नगरपरिषदा,
नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ५५ ब मधील तरतुदीनुसार दिनांक ७ एप्रिल पासून ६ वर्षाचा कालावधी समाप्त होईपर्यंत नगर परिषद सदस्य म्हणून निवडले जाण्यास अपात्र ठरविण्यात आले आहे. मात्र रिट याचिका क्र.५५३९/२०२१ मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सदर आदेश वैभव खेडेकर यांना प्राप्त झाल्यापासून चार आठवड्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button