
रत्नागिरी, खेड, चिपळुणात शिवसेनेने केला सोमय्यांचा निषेध
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, खेड, चिपळूण याठिकाणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा युवा व शिवसैनिकांनी निषेध केला.
रत्नागिरीत घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या अटकेची मागणी केली. खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी हे आंदोलन केले. यावेळी आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष जयसिंग घोसाळे, विभाग प्रमुख विजय खेडेकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा चिपळूण शिवसेनेच्यावतीनेही गुरूवारी शिवाजी महाराज चौकात निषेध करण्यात आला. यावेळी किरीट सोमय्या व केंद्र शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, माजी नगरसेविका सई चव्हाण, शशिकांत मोदी, युवा सेना तालुका अधिकारी उमेश खताते, विभागप्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सोमय्या यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी खेड शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवदेन गुरुवारी दि. 7 रोजी तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले. खेड येथील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. शिवसेना तालुका प्रमुख विजय जाधव, शहरप्रमुख निकेतन पाटणे, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती अरूण कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, युवतीसेना व शिवसैनिकांनी या आंदोलनात सहभागी घेतला.