प्रखर राष्ट्रवाद, अंत्योदय, सबका साथ ही त्रिसूत्री व केडर बेस पार्टीला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड आणि मोदीजींचे प्रभावी नेतृत्व यामुळे ४२ वर्षांची भा.ज.पा.ची वाटचाल यशस्वी – ॲड. दीपक पटवर्धन

आज भा.ज.पा.चा वर्धापनदिन दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही मंडलात उत्साही वातावरणात साजरा केला गेला. भा.ज.पा.चे झेंडे स्वतःचे घरावर आरोहित करण्यात आले. सकाळी १०.०० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशभरातील कार्यकर्त्यांना संबोधित केले. रत्नागिरी शहर कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून मोदीजींचे विचार ऐकले. त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला व ध्वजाला मानवंदना देण्यात आली. तसेच भा.ज.पा.च्या कार्यकर्त्यांनी सामूहिकपणे श्री देव भैरी मंदिरात टू व्हीलर्सने जाऊन तृणबिंदूकेश्वर व भैरीचे दर्शन घेतले. भा.ज.पा.चे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी १९५२ पासून भा.ज.पा विचारधरेसाठी अविरत काम करणारे नेते, कार्यकर्ते, प्रखर राष्ट्रवादी भूमिका अंत्योदयाचे तत्त्वाचा सक्रिय अंगीकार “सबका साथ सबका विकास” ही कार्यशैली केडर बेस प्रभावी संघटनाला नव तंत्रज्ञानाची आयुधे आणि नरेंद्रजी मोदी यांचे प्रभावी, यशस्वी, विश्वासार्ह नेतृत्व यांच्या मिलाफामुळे आज भा.ज.पा. देशात सातत्याने जनसमर्थन प्राप्त करत आहे असे प्रतिपादन ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले. भा.ज.पा.ची विचारधारा अधिक अग्रेसर करत, नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे प्रभावी कार्य अनेकविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचवत, लाभार्थीना योजनांचा लाभ प्राप्त व्हावा म्हणून प्रयत्न करत भा.ज.पा.चा रत्नागिरीतील जनाधार वाढवण्याचे काम सर्वजण मिळून करूया. भा.ज.पा.च्या वर्धापनदिनी सर्व भा.ज.पा. कार्यकर्ते, हितचिंतक, पदाधिकारी सर्वांना शुभेच्छा देत असल्याचे ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले.
याप्रसंगी ॲड.बाबा परुळेकर, माजी आमदार बाळ माने, श्री.सचिन करमरकर, श्री.सचिन वहाळकर, श्री.राजेश सावंत, सौ. जठार, श्री.अनिकेत पटवर्धन, श्री. संदीप सुर्वे, श्री.व्ही.कि. जैन यांचेसह बहुसंख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
भा.ज.पा.चा वर्धापनदिन अत्यंत उत्साहात, उत्सवी वातावरणात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button