
देवाचा नवस फेडण्यासाठी केला ३५० कि.मी.चा प्रवास
देवाला बोललेला नवस फेडण्यासाठी भक्तगण बरेच काही करतात. एकदा नवस फेडायचा ठरवले की त्यात मागे पुढे होत नाही. याचा प्रत्यय नजिकच्या वांझोळे गवळीवाडी येथील अजित महादेव गवळी यांनी आणून दिला. वयाच्या ४९ व्या वर्षी ते मुंबई ते वांझोळे असा २२ तासांचा आणि ३५० कि.मी.चा सायकल प्रवास त्यांनी एकट्याने यशस्वी केला आहे.
एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली तर काहीही होऊ शकते. याचंच प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वांझोळे खुर्द, गवळीवाडी येथील रहिवासी अजित महादेव गवळी. गावचे ग्रामदैवत आई जुगाई देवीवर नितांत श्रद्धा असणारे अजित गवळी यांनी एकदा तरी तुझ्या शिमगोत्सवाला सायकलने प्रवास करून येईन, असा नवस केला होता. दोन वर्षे कोरोनात गेल्याने यावर्षी हा नवस फेडायचा, असा चंग बांधत गवळी यांनी २३ मार्च २०२२ ला दुपारी ३ वाजता मुंबईला सिद्धीविनायकाचे दर्शन घेवून सायकल प्रवास सुरू केला. दरम्यान, गावात पोचल्यावर २५ मार्चला जुगाईदेवी मंदिरात पालखी वास्तव्यास असल्याने रात्री विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यावेळी वाडीप्रमुख पांडुरंग सदाशिव वाजे व गावकर सीताराम रत्नू वाजे यांच्या हस्ते अजित महादेव गवळी यांचा सत्कार करण्यात आला.
www.konkantoday.com