मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर काळकाई मंदिर समितीचा बहिष्कार

दापोलीचे ग्रामदैवत असणार्‍या काळकाई मंदिर जीर्णोद्धार व सभामंडप बांधणे, या कामाच्या भूमिपूजनासाठी ९ मार्च रोजी दापोलीत येणार्‍या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर श्री देवी काळकाई देवस्थान मंदिराचे सर्व पदाधिकारी बहिष्कार घालणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर चोरगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या ९ मार्च रोजी होणार्‍या दौर्‍याकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे.यावेळी ते म्हणाले की, देवस्थानसाठी जो निधी उपलब्ध झाला यात कोणाचाही राजकीय सहभाग नाही मात्र राजकीय हेतूपोटी सुमारे ४ वर्षापूर्वी आलेला हा निधी नगर पंचायतीत रोखून ठेवण्यात आला व ऐन दापोली नगर पंचायत निवडणुकीत तो ग्रामस्थांसमोर आणण्यात आला. श्री देवी काळकाई देवस्थान हे जागृत देवस्थान असल्याने अशा छोट्या प्रवृत्तींना ग्रामस्थांनी त्यांची जागा दाखवून दिली. मात्र आता तेथे जीर्णोद्धार व सभा मंडप बांधण्यात येणार आहे, असे ऐकिवात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा घोषित होवूनही याबातीत कोणतीही माहिती खुद्द देवस्थान ट्रस्टलाच नसल्यामुळे आपण व आपला कोणताही पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button