रत्नागिरीत हभप माधुरी जोशी यांचा ४ पासून श्री रामकथा सप्ताह
रत्नागिरी : वेदांत भास्कर डॉ. श्रीकृष्ण देशमुख काका परिवारातर्फे बुलढाण्यातील हभप सौ. माधुरा जोशी यांची प्रवचने आयोजित केली आहेत. ४ ते १० एप्रिल या काळात विठ्ठल मंदिरात श्री रामकथा यावर त्यावर त्या बोलणार आहेत. दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत प्रवचन होईल.
सौ. माधुरी जोशी या बीए असून गृहिणी, समर्थभक्त आहेत. समर्थ वाङमयाचा गाढा अभ्यास आहे. डॉ. काका देशमुख यांच्या अनुग्रहित साधक आहेत. त्यांनी संत वाङमयावर विपुल लेखन केले आहे. मनाचे श्लोक लेखमाला, संत तुकाराम महाराजांचे निर्वाणीचे १२ अभंगांवर लेखमाला, सज्जनगड, रघुवीर समर्थ मासिक आणि भक्तीयोग त्रैमासिकात त्या लेखन करतात. श्री गुरुगीता व चांगदेव पासष्टी या दोन ग्रंथांचे मोहनराव कुलकर्णी यांच्यासोबत सहलेखन केले आहे. डॉ. काकांची ओवीबद्ध स्तवनांजली, नामामृतधारा व मानसपुजा या पुस्तकाचे प्रकाशन अलीकडेच झाले. ब्रह्मपुरी, मिरज, बुलढाणा येथे त्यांनी रामकथा, भागवतकथा संगितल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या रामकथा सप्ताहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजिका डॉ. निशिगंधा पोंक्षे, सौ. गौरी ढवळे यांनी केले आहे.