
Lप्रेरणादायी! दाभोळे धनगरवाडीतील तरूण बनला पोलिस उपनिरीक्षक
संगमेश्वर : तालुक्यातील दाभोळे धनगरवाडी येथील रवींद्र कोलापटे या युवकाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल साखरपा-दाभोळे पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
अतिशय बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन या युवकाने समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर्श ओळख निर्माण केली आहे. रवींद्र कोलापटे याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल दाभोळे धनगरवाडी येथील रहिवाशांनी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला तर येथील सभागृहात या युवकाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे दाभोळे परिसरात देखील सत्कार करण्यात आला.