स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प हवा की नको याबात पुढील निर्णय घेतला जाईल -मंत्री उदय सामंत
नाणार (ता. राजापूर) येथे आता ग्रीन रिफायनरी नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बारसू (राजापूर) येथे रिफायनरीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राने कळवले आहे. प्रकल्पासाठी ती जागा योग्य असल्याचे केंद्राने कळवले तर, स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करूनच प्रकल्प हवा की नको याबात पुढील निर्णय घेतला जाईल. राज्य शासनाची आणि शिवसेनेची हीच भूमिका आहे,असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.
झूम मीटिंगद्वारे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान पुन्हा एकदा रिफायनरी प्रकल्पाचा विषय चर्चेला आला. त्यामुळे प्रकल्पाबाबत शिवसेनेची आणि शासनाची नेमकी भूमिका काय, असे सामंत यांना विचारले असता ते म्हणाले, ग्रीन रिफायनरीसाठी नाणारचा विषय संपला आहे. उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली आहे; मात्र बारसू येथे आवश्यक जागा उपलब्ध होऊ शकते आणि तशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. हा प्रकल्प हवा की नको, याबाबत स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईलस्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेताच नाणार येथे रिफायनरी प्रकल्प लादला गेला. त्या वेळी शिवसेना स्थानिकांसोबत राहिली. बारसू येथे प्रकल्पासाठी आवश्यक सुमारे १० ते १२ हजार एकर जागा उपलब्ध होऊ शकते. एमआयडीसीच्या ताब्यातील ती जागा आहे. प्रकल्पासाठी ती योग्य आहे की नाही, हे तपासून केंद्र शासन कळवेल. सर्व जागेवर कातळ आहे. तेथे घरे किंवा मोठ्या प्रमाणात बागा नाहीत. त्यामुळे कोणीही विस्थापित होण्याचा प्रश्न उद्भवत नाही,असे स्पष्टीकरण सामंत यानी दिले.
www.konkantoday.com