भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा अध्यक्ष पदाचा राजीनामा

संपुर्ण राज्याचे तसेच जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला.निवडणुकीत राणे कुटुंबियांनी आपला करिष्मा दाखवून दिला. या निकालांमध्ये भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनेलने ११ जागांवर विजय मिळवत बँकवर सत्ता काबीज केली आहे. तर शिवसेना आणि महाविकास आघाडीला ८ जागावर समाधान मानावे लागले.

जिल्हा बँक निवडणूकीत भाजपचे पॅनल निवडून आले असले तरी भाजपच्या १९ पैकी १९ जागा निवडून आणू न शकल्याने भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढे भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याची घोषणा राजन तेली यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button