रिफायनरी प्रकल्प अमृतमहोत्सवी वर्षात अमृतमंथनातून प्राप्त अमृतकलशासारखा हा प्रकल्प स्थानिक युवकांचा भाग्यविधाता ठरेल भा.ज.पा.ची स्पष्ट भूमिका – ॲड.दीपक पटवर्धन

रिफायनरी सारखा मोठा प्रकल्प आपल्या भागात होत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे.
भाजपा प्रकल्पा साठी आग्रही
भा.ज.पा. सातत्याने या प्रकल्पाच्या बाजूने उभा आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातच व्हावा म्हणून आग्रही पण आहे. औद्योगिकरणाच्या या युगात कोणीही फार काळ औदयोगिकिकरणा पासून स्वतःला दूर ठेवून पुढे जाऊ शकत नाही. प्रकल्प राजापूर येथे येत असेल तर सर्वांनी मिळून प्रकल्पाचे स्वागत करायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन ॲड.दीपक पटवर्धन भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष यांनी केले.
स्थानिकांना पूर्ण माहिती देऊन विश्वास निर्माण करणे महत्वाचे
प्रकल्प आल्याने स्थानिक रहिवाशांचे काही प्रश्न निर्माण होतील. त्यांचे पुनर्वसन, जमिनीची योग्य किंमत, नुकसान भरपाई तसेच रोजगार संधी या संदर्भात ठोस भूमिका ठरवून स्थानिकांच्या मनात असलेले प्रश्न, संशय, भीती यांचे निराकरण करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी राजकीय हेवेदावे सोडून स्वार्थी समीकरणे दूर ठेवत प्रयत्न करणे यातच आपल्या जिल्ह्याचे हित आणि युवकांचे भविष्य निगडित झालेले आहे.
सत्ता धाऱ्यांची भूमिका बेजबाबदारशाश्वत भूमिका नाही*
राज्य सरकारने प्रकल्पाबाबत शाश्वत भूमिका घेणे आवश्यक “जनतेला हवा तर” वगैरे वक्तव्य संधीसाधूपणाची आहेत. दूरदृष्टी विकासाची निश्चित संकल्पना नसल्याचे हे द्योतक म्हणजे ही संदिग्ध भूमिका. स्थानिक जनतेला हवा असेल, पाठींबा असेल तर प्रकल्प होईल अशी सरकारची भूमिका चुकीची आहे. उद्योग व्यवसायासंदर्भात धोरण ठरलेले असते. येणाऱ्या प्रकल्पाची माहिती, तांत्रिक बाजू, होणारे परिणाम, दुष्परिणाम या ची वस्तुनिष्ठ माहिती शासनाकडे असते. उद्योगासाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. त्यामुळे राज्यशासनाच्या प्रामुख्याने नरोवा कुंजरोवा भूमिका घेणे हे कांगावेखोरपणाचे लक्षण आहे. जनतेची ही घोर फसवणूक, दिशाभूल आहे.
शासन प्रमुखाकडे निश्चित व्हिजन नाही याचे हे द्योतक आहे. ज्या भागात हा प्रकल्प प्रस्थापित आहे. त्या ठिकाणी सर्व सत्तापदे सातत्याने धारण करणाऱ्या पक्षाने विकासाला वेग देणारा प्रकल्प अधांतरी सोडून द्यावा ही जनतेची फसवणूक आहे. खरंतर प्रकल्पाबाबत समज-गैरसमज हे शासन यंत्रणेने राजकिय सत्ताधिश नेतृत्वाने जनतेमध्ये जाऊन दूर केले पाहिजेत. योग्य माहिती दिली पाहिजे.
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे पुढाकार घेऊन प्रकल्प मार्गी लावतील
केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे साहेब यांनी केंद्रस्थानी पुढाकार घेऊन रिफायनरी प्रकल्पाचे जिल्ह्यातील आगमन आणि उभारणी सुकर करावी. ना.नारायणराव राणे साहेबांचे नेतृत्व दूरदृष्टीने काम करणारे नेतृत्व असल्याने हा प्रकल्प राजापूर येथेच प्रस्थापित होण्याची खात्री वाटते. भा.ज.पा.ची भूमिका हा प्रकल्प लवकरात लवकर उभारणी करून सुरू व्हावा. स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन प्राधान्याने प्राथमिकतेने व्हावे अशीच आहे असे जिल्हाध्यक्ष भा.ज.पा ॲड. दीपक पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button