
निवडणुकीच्या वादातून अज्ञात इसमाने तीन मोटरसायकली जाळल्या ८०हजाराचे नुकसान, चिपळूण कापसाळ येथील प्रकार
नुकत्याच पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या कारणावरून अज्ञात इसमाने चिपळूण कापसाळ येथील पायर वाडीतील तीन मोटारसायकल जाळून टाकण्याचा प्रकार घडला आहे याबाबत कापसाळ येथील भारती दाते यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीच्या अंगणात लावून ठेवलेल्या फिर्यादीच्या एक्सेस ,सीबीझेड व यामा अशा तीन मोटरसायकल अज्ञात इसमाने नुकसान करण्याच्या हेतूने पेटवून देऊन नुकसान केले हा प्रकार नुकत्याच झालेल्या निवडणुकीतून घडला असल्याचेकळते पोलिसांनी अज्ञात विरोधात गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com