रत्नागिरी भूमापन कार्यालयातील कागदपत्रांना लागली वाळवी ,लोकांचे रेकॉर्ड सुरक्षित की असुरक्षित
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या रत्नागिरी भूमापन कार्यालयातील अनेक कागदपत्रांना मोठ्या प्रमाणावर वाळवी लागली आहे अनेक कागदपत्रे वाळवीने खाऊन टाकली असून या कार्यालयाच्या बाहेर वाळवीने खाल्लेली कागदपत्रे बाहेर आणण्यात आली आहेत खणात ठेवलेल्या कागदपत्रांना वाळवीने ग्रासले आहे वाळवीने या कागदपत्रांचा अक्षरशः भुगा केला आहे कार्यालयाच्या बाहेरच अशीवाळवी लागलेले कागदपत्रे दिसत आहेत या कार्यालयातून नागरिकांना जागेचे नकाशे देण्याचे काम केले जाते कार्यालयाच्या कामकाजाबाबत लोकांच्यात आधीच नाराजी आहे या कार्यालयातील काम संथ गतीने चालले जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे अनेकांनी अर्ज केल्यानंतर त्यांना कागदपत्र मिळवण्यासाठी अनेक दिवस पायपीट करावी लागते आता या कार्यालयातील नेमक्या कोणत्या कागदपत्राना वाळवी लागली आहे व ते किती महत्त्वाची आहेत याची तपासणी होणे जरुरीचे आहे व याबाबत वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे अनेकवेळा नागरिकांनी अर्ज केल्यानंतर आमच्याकडे रेकॉर्ड नाही असे पालुपद लावले जाते त्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते आता वाळवीनेच अनेक कागदपत्र नष्ट झाल्याने लोकांच्या रेकॉर्डचे भवितव्य काय हा प्रश्न निर्माण झाला आहे
www.konkantoday.com