दापोलीत चाकूने आशा सेविकेचा खून; सासर्‍यानेही केले स्वत:वर वार

दापोली : शहरालगत असलेल्या टाळसुरे आष्टचीवाडी येथे चाकूहल्ल्यात महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणानंतर महिलेच्या सासर्‍याने स्वत:वर वार केल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी डेरवण येथील वालावकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांचा सहसंबंंध असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मंगळवार (दि. 29 मार्च) रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरती अभिषेक सणस (वय 32) असे मृत्यू झालेल्या सुनेचे नाव असून मधुकर धोंडू सणस (वय 62) असे सासर्‍याचे नाव आहे. आरती सणस ही टाळसुरे येथे आशा सेविका म्हणून कार्यरत होती. तिचा पती मजुरीचे काम करतो. घटना घडली तेव्हा पती घराबाहेर कामानिमित्त गेले होते. मृत आरती हिला पाच वर्षांचा एक मुलगा आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button