
ग्राहकांना सर्वोत्तम हापूस आंबा देण्यासाठी कोकणातील दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी एक्याम ब्रँडखाली एकत्रित
ग्राहकांना सर्वोत्तम हापूस आंबा देण्यासाठी कोकणातील दोन हजारपेक्षा अधिक शेतकरी एक्याम ब्रँडखाली एकत्रित येत आहेत. इनोटेरा कंपनीकडून ही पावले उचलण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात थेट बागांमध्ये जाऊन हापूस खरेदी सुरू झाली.आतापर्यंत दीड हजारहून अधिक पेट्या कंपनीने एक्याम ब्रँडद्वारे महाराष्ट्रासह विविध राज्यांत पोहोचविल्या आहेत.
इनोटेरा कंपनीकडून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत चाचपणी करण्यात आली होती. बागायतदारांच्या सहकारी शेतकरी सोसायटींना एकाच छताखाली आणण्याचा निर्णय झाला. या शेतकऱ्यांकडील आंबा ‘एक्याम’द्वारे विकला जात आहे. आतापर्यंत दीड हजार पेट्यांची विक्री झाली. महाराष्ट्रातील प्रमुख मुंबई, पुणे शहरांसह दिल्ली, जयपूर, आग्रा, कोलकता या राज्यांतही हापूस पोहोचला आहे. शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करण्यात येत असून, यात रत्नागिरी, देवगड, पावस, वेंगुर्ला, केळशी आणि इतर भागांमधील को-ऑपरेटिव्ह सोसायटी इनोटेरासोबत भागीदारी करण्यात येत आहे. आंबे गोळा करण्यासाठी वातानुकूलित गाड्यांचा वापर केला जातो.
कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना एकत्र आणणारी ही भागीदारी ऐतिहासिक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या फळांचे शक्य तितके सर्वोत्तम मूल्य मिळविण्यात मदत करण्याच्या या वाटचालीत ब्रँडची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
www.konkantoday.com