बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारक उमेदवारांना बोगस प्रमाणपत्र समर्पणासाठी आवाहन


रत्नागिरी दि.25:- खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत पाच टक्के आरक्षण ठेवलेले असून बोगस क्रीडा प्रमाणपत्र धारण करून क्रीडा विभागाकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी केलेली आहे तसेच काही उमेदवारांनी शासकीय सेवेचा लाभ घेतला आहे अशा युवा उमेदवारांना भविष्यात अडचण निर्माण होऊ नये यासाठी एक संधी म्हणून “बोगस क्रीडा प्रमाणपत्र/बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल समर्पण योजना”चा शासन निर्णय धोरणात्मक निर्णय घेतला आहे.
ज्या उमेदवारांनी क्रीडा संचालनालय व विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांचे यांचेकडून बोगस क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी करून घेतली असेल, अशा उमेदवारांना तसेच त्या आधारे शासकीय, निमशासकीय व इतर कार्यालयामध्ये नोकरी धारण केली आहे अशा उमेदवारांनी मुळ क्रीडा प्रमाणपत्र व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे यांचेकडे व्यक्तीशः अथवा पत्राद्वारे ३१ मे, २०२२ पुर्वी समर्पित करण्यात यावीत अशा उमेदवारांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील. मुदतीत बोगस क्रीडा प्रमाणपत्रे व मुळ क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल जमा न केल्यास संबंधीत उमेदवार व संबंधीत क्रीडा संघटना यांचे विरूध्द फौजदारी कारवाई करण्यात येईल. बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक उमेदवारांनी ३१ मे २०२२ पर्यंत आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळूंगे बालेवाडी, पुणे येथे आपला अहवाल सादर करावा. असे आवाहन श्री ओम प्रकाश बकोरिया, आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, म. रा. पुणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button